भारताने आज अधिकृतपणे क्षेपणास्त्र नियंत्रण कराराच्या (एमटीसीआर) कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या असून जागतिक अण्वस्त्र प्रसारबंदीसाठीच्या निकषांसाठी ही बाब फायद्याची आहे असे सांगण्यात आले. भारत आता एमटीसीआरचा पूर्ण सदस्य झाला आहे. बहुदेशीय निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताने प्रथमच प्रवेश केला असून परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी एमटीसीआरच्या कागदपत्रांवर फ्रान्सचे नियोजित राजदूत अ‍ॅलेक्झांडर झिगलर यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या. नेदरलँडचे राजदूत अल्फान्सस स्टोलिंगा व लक्झेमबर्गचे राजदूत लॉरी हुबर्टी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने आज सकाळी अधिकृतरीत्या एमटीसीआर व्यवस्था स्वीकारली. भारताचा या व्यवस्थेत प्रवेश झाल्याने एमटीसीआरच्या सदस्यांची संख्या आता ३५ झाली आहे. अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कामी ही व्यवस्था विशेष उपयोगी ठरणार आहे. एमटीसीआरच्या भागीदार देशांचे भारताने पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. नेदरलँड्सचे राजदूत पीटर डी क्लर्क व लक्झेमबर्गचे एमटीसीआर सहअध्यक्ष रॉबर्ट स्टेनमेटझ यांचे आम्ही आभार मानतो. एमटीसीआरच्या पॅरिसमधील संपर्कप्रमुखांनी फ्रान्स दूतावासाच्या मार्फत भारताला प्रवेश देण्यात आल्याचे कळवले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to become full member of mtcr today
First published on: 28-06-2016 at 02:54 IST