अमेरिकेच्या उत्तर कॅलिफॉर्नियात भारतीय वंशाच्या बेपत्ता कुटुंबाचे बुधवारी मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूआधी या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. मर्सेड काऊंटी पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे. या व्हिडीओत बंदुकीचा धाक दाखवत हल्लेखोराने एका ट्रकिंग कंपनीतून भारतीय वंशाच्या धेरी कुटुंबाचे अपहरण केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत शिख कुटुंबाचे अपहरण करण्यापूर्वी संशयित परिसराची टेहळणी करताना दिसत आहे.

अपहरण, हत्या अन् फळबागेत मृतदेह; अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ, जाणून घ्या काय घडलं?

याप्रकरणी मर्सेड काऊंटी पोलिसांनी ४८ वर्षीय मन्युअल सॅलगाडो या संशयिताला अटक केली आहे. पीडिताच्या एटीएम कार्डचा वापर केल्यानंतर या आरोपीचा पोलिसांनी छडा लावला आहे. अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियातील एका फळबागेत भारतीय वंशाच्या धेरी कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या आरोहीसह तिची आई २७ वर्षीय जसलीन कौर, वडील जसदीप सिंग आणि काका अमनदीप सिंग यांचा समावेश आहे.

Mexico Firing : अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये गोळीबार, महापौरांसह १८ जणांचा मृत्यू

या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचींन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शेरिफ वार्न्के या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


दरम्यान, ट्रकिंग कंपनीतून काहीही चोरीला गेले नसल्याचे पीडितांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. घटनेच्या वेळी पीडितांनी दागिने घातले असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. अपहरण केल्यानंतर संशयिताने खंडणीची मागणी केली नाही, अशी माहितीही मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली आहे.