घरात आईशी भांडणानंतर संतापाच्या भरात जितेंद्र अर्जुनवार हा १५ वर्षांचा मुलगा घर सोडून खोक्रापारजवळ सीमेतून पाकिस्तानी हद्दीत गेला. त्याला पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली. आता या मुलाला सिंध प्रांतातील हैदराबाद शहरातील बालतुरुंगात ठेवण्यात आले आहे.
खोक्रापार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र हा मध्य प्रदेशचा आहे. घरात दोन महिन्यांपूर्वी भांडण झाल्याने तो बाहेर पडला. तो इकडे-तिकडे फिरत होता. फिरत तो तारेचे कुंपण असलेल्या भागातून पुढे गेला. मात्र तहान लागल्यावर लष्कराच्या वेषात काही नागरिक आढळले. त्यानंतर चौकशी दरम्यान ही बाब उघड झाली, असे खोक्रापारचे पोलीस अधिकारी खुर्शिद भट्टी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
सीमा ओलांडून गेलेल्या भारतीय मुलाला अटक
घरात आईशी भांडणानंतर संतापाच्या भरात जितेंद्र अर्जुनवार हा १५ वर्षांचा मुलगा घर सोडून खोक्रापारजवळ सीमेतून पाकिस्तानी हद्दीत गेला. त्याला पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली.
First published on: 22-08-2013 at 06:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian teen crosses over into pak arrested