दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्चुअल शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेत कोणीही प्रवेश घेऊ शकतो. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच केली. या शाळेच्या माध्यमातून जेईई-एनईईटीसाठी विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. मात्र, राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेने (NOIS) याबाबत खुलासा केला आहे. देशातील पहिली व्हर्चुअल शाळेची सुरुवात केजरीवालांनी नाही तर केंद्र सरकारने सुरु केली असल्याचा खुलासा केला आहे. एनओआयएसने याबाबत निवेदनही जारी केले आहे.

हेही वाचा- हतबलतेतून केजरीवालांकडून खोटे आरोप, दिल्लीच्या नायब राज्यपालांचा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन पलटवार

कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात.

व्हर्चुअल शाळेच्या प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. या व्हर्चुअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात. व्हर्चुअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. सध्या, एनओआयएसशी संलग्न ७ हजारहून अधिक अभ्यास केंद्रे गरजू विद्यार्थ्य़ांना मदत करत आहेत. तसेच दीड हजारहून अधिक अभ्यास केंद्रे वर्च्युअल शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मदत करत आहेत. या व्हर्चुअल शाळेमध्ये ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.

हेही वाचा- “सिसोदियांना अटक केली तर गुजरातमध्ये…”; अरविंद केजरीवालांचं मोठं वक्तव्य

शैक्षणिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने (MOE) १९८६ च्या राष्ट्रीय धोरणानुसार एक स्वायत्त संस्था म्हणून नोव्हेंबर १९८९ मध्ये NOIS ची स्थापन केली होती. एनओआयएस संस्था माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावर सामान्य आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध करून देत आहे.

करोनाच्या काळात पहिल्यांदा व्हर्च्युअल क्लासचे मॉडेल समोर

व्हर्च्युअल किंवा ऑनलाइन क्लासचे मॉडेल प्रथम करोनाच्या काळात समोर आले होते. त्याकाळात ही पद्धत ऑनलाईन क्लासेससाठी वापरण्यात आली होती. परंतु आता हे मॉडेल इतर गोष्टींसह लॉन्च करण्यात आले आहे. त्यानुसार या शाळेत वर्ग ऑनलाइन होणार असून, डिजिटल लायब्ररीतील इतर सर्व आवश्यक सुविधा केवळ ऑनलाइनच उपलब्ध असणार आहे. ही शाळा गुगल आणि इंडिया नेट प्लॅटफॉर्मने तयार केली असून, यामध्ये देशभरातील १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुले प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत.

व्हर्च्युअल शाळेची वैशिष्ट्ये काय ?

या शाळेत इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमही येथे चालवले जाणार असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकणार आहे. ही शाळा प्रामुख्याने अशा मुलांसाठी आहे जे कोणत्या ना कोणत्या कारणाने अभ्यासापासून दूर आहेत. या शाळेत मुले एकतर थेट वर्गांना उपस्थित राहू शकतात किंवा त्यांच्या आवडीनुसार रेकॉर्डिंग पाहू शकणार आहेत.