scorecardresearch

Premium

मोदी सरकाने सुरक्षेच्या दृष्टीने १८ भारतीय आणि ४ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्स केले बॅन; वाचा यादी

यासोबतच मंत्रालयाने ३ ट्विटर अकाउंट, १ ​​फेसबुक पेज आणि १ वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकाने सुरक्षेच्या दृष्टीने १८ भारतीय आणि ४ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्स केले बॅन; वाचा यादी

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ४ पाकिस्तानी YouTube चॅनेलसह २२ YouTube चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. हे चॅनल राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मंत्रालयाने ३ ट्विटर अकाउंट, १ ​​फेसबुक पेज आणि १ वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटलंय की, “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी नियम, २०२१ अंतर्गत २२ YouTubeवरील न्यूज चॅनेल, ३ ट्विटर अकाउंट, १ फेसबुक अकाउंट आणि १ न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी आपत्कालीन अधिकारांचा वापर केला आहे. या YouTube चॅनेलचे एकूण सब्स्क्रायबर्स लाखांमध्ये होते. या चॅनलवर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था या संवेदनशील विषयांवर खोट्या बातम्या दाखवल्या.”

भारतीय यूट्यूब चॅनेलवर प्रथमच कारवाई –


मंत्रालयाने सांगितले की, “गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयटी नियम, २०२१ लागू झाल्यानंतर प्रथमच भारतीय यूट्यूब आधारित न्यूज चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. आदेशानुसार १८ भारतीय आणि ४ पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत.

मंत्रालयाने म्हटले आहे की, “सर्व बंदी घातलेले भारतीय YouTube चॅनेल काही टीव्ही न्यूज चॅनेलचे टेम्पलेट्स आणि लोगो वापरत होते, ज्यात त्यांच्या न्यूज अँकरच्या फोटोंचा वापर करून दर्शकांना बातम्या खऱ्या असल्याचा विश्वास दिला जातो. तर काही प्रकरणांमध्ये असे देखील आढळून आले की, पाकिस्तानमधून जाणीवपूर्वक भारतविरोधी खोट्या बातम्या येत होत्या.

बंदी घातलेल्या भारतीय युट्यूब चॅनेल्सची यादी –

ARP News, AOP News, LDC News, SarkariBabu, SS ZONE Hindi, SS ZONE Hindi, Smart News, News23Hindi, Online Khabar, Online Khabar, PKB News, KisanTak, KisanTak, Sarkari News Update, Bharat Mausam, RJ ZONE 6, Exam Report, Digi Gurukul, दिनभरकीखबरें

पाकिस्तानी चॅनेल्सची यादी –
DuniyaMeryAagy, Ghulam NabiMadni, HAQEEQAT TV, HAQEEQAT TV 2.0

ही आहे बॅन केलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी चॅनेल्सची यादी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information and broadcasting ministry banned 22 youtube channels including 4 pakistani channel hrc

First published on: 05-04-2022 at 16:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×