इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्सशी सामना करताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सला मधल्या फळीची चिंता अधिक भेडसावत आहे.
चेन्नईतील अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्जने नऊ गडी राखून नामोहरम केले. दिल्लीच्या टप्प्याला प्रारंभ करताना दोन सलग पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने आतापर्यंत तीन पराभव पत्करले आहेत. परंतु त्यांनी अखेरच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा सहा गडी राखून हरवले.
मुंबई इंडियन्स
बोल्ट, बुमरा, चहर यांच्यावर मदार
गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमरा हाणामारीच्या षटकांमध्ये आपली भूमिका चोख बजावत आहेत. लेग-स्पिनर राहुल चहर (एकूण ९ बळी) फिरकीची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (एकूण २०१ धावा) चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरत आहे. तसेच क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि किरॉन पोलार्ड धावांसाठी झगडत आहेत.
* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी