Israel Iran Conflict LIVE Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे, तर इराणकडूनही इस्रायलमधील काही शहरांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे. दरम्यान, इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Israel Iran Conflict Highlights : इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
सात बी-२ बॉम्बर्स, १२५ जेट, १3 हजार किलो वजनाचे डझनभर बॉम्ब अन् २५ मिनिट; अमेरिकेने इराणवर कसा केला हल्ला?
इस्रायल-इराणमधील संघर्षात आणखी वाढ झाली असून इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेचीही एन्ट्री झाली. अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करताना नेमकं कशाचा वापर केला? अमेरिकेला हा हल्ला करण्यासाठी किती कालावधी लागला? अमेरिकेने हवाई हल्ले करताना इराणने प्रत्युत्तर दिलं नाही का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. मात्र, यावर आता या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संयुक्त चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
Iran-Israel Conflict : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय! भारतासह संपूर्ण जगावर होणार परिणाम
US Airstrikes Iran : सात बी-२ बॉम्बर्स, १२५ जेट, १3 हजार किलो वजनाचे डझनभर बॉम्ब अन् २५ मिनिट; अमेरिकेने इराणवर कसा केला हल्ला?
Israel-Iran Conflict : "आज जागे झाले नाहीत तर अल्लाह…", इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फारूख अब्दुल्लांचे विधान चर्चेत
Dmitry Medvedev : "इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार", अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियन नेत्याचा मोठा दावा
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींना इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन; मोदी म्हणाले, “सध्याची परिस्थिती…”
अमेरिकेचे इराणच्या अणु प्रकल्पांवरील हल्ले आणि मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि परिस्थिती बिघडत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार
इस्रायल-इराणमधील संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. मात्र, या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झालेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संदर्भातीलम माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की ते रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला जातील. एपीच्याहवाल्याने इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात ही माहिती दिली आहे.
“खोमेनींची सत्ता उलथवून टाका, अन्यथा…”, हद्दपार केलेल्या इराणच्या राजाची अमेरिकेच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया
Iran Exiled Prince Reza Pahlavi on US Attacks on Iran : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे जगभर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या अणूऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. तर, इराणने इस्रायलवर क्षेपणास्र डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, इराणचे हद्दपार केलेले राजे रेझा शाह पहलवी यांनी इराण-अमेरिका संघर्षाचं खापर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्यावर फोडलं आहे. रेझा शाह पहलवी म्हणाले, “इराणमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतरच शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते”.
Narendra Modi Condemns US Strikes On Iran : इस्रायल-इराणमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु असून या संघर्षात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच या दोन्ही देशांच्या संघर्षात आता अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर आज मोठे हवाई हल्ले केले आहेत. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर या हल्ल्याबाबत माहिती देखील दिली आहे. अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्यानंतर आता जगभरातील अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता यावर भारतानेही प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला असून तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsSpoke with President of Iran @drpezeshkian. We discussed in detail about the current situation. Expressed deep concern at the recent escalations. Reiterated our call for immediate de-escalation, dialogue and diplomacy as the way forward and for early restoration of regional…
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025
US Strikes On Iran : आधी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा अन् आता निषेध; इराणवरीलअमेरिकेच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया चर्चेत
China : "अमेरिकेची कृती धोकादायक…", इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्यानंतर चीनने काय म्हटलं?
US Airstrikes Iran : ३७ तास नॉनस्टॉप उड्डाण, हवेतच भरलं इंधन; अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर नेमकं कसा केला हल्ला?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर कतारने काय म्हटलं?
अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झालेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संदर्भातीलम माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसेच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कतारने दुःख व्यक्त केले आहे.
Iran Warns US: “आता आमची वेळ, पहिला हल्ला तुम्ही केलात, पण…”, इराणचा अमेरिकेला इशारा
Iran Warns US: गेल्या दहा दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने थेट सहभाग घेतला असून, इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर काही तासांतच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कोणताही विलंब न करता बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांचे प्रतिनिधी हुसेन शरीयतमदारी यांनी इराणी माध्यमांना सांगितले की, पहिले पाऊल म्हणून ते बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करतील आणि होर्मुझचा सागरी मार्ग बंद करतील.
अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यामुळे रेडिएशनचा धोका? इराणी जनतेत भीती; इराणचं सरकार म्हणालं…
Israel Iran conflict Live : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर मोठा हवाई हल्ला, अनेक भागांना केलं लक्ष्य, ११ जण जखमी
Israel Iran conflict Live : इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झालेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यानंतर आता इराणने पुन्हा एकदा उत्तर इस्रायलमधील अनेक भागांना लक्ष्य केलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली राज्य माध्यमांनी सांगितलं की, नेस झिओना, रिशोन लेझिओन आणि बंदर शहर हैफा येथे हल्ला झाला. या हल्ल्यात मध्य आणि उत्तर इस्रायलमधील अनेक भागांना फटका बसला आहे. आता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला असून यामध्ये ११ जण जखमी झाले आहेत.
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प काय म्हणाले?
इस्रायल-इराणमधील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. हा हवाई हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “अमेरिकन सैन्याने जे केले आहे ते कोणतेही सैन्य करू शकले नसते. जर इराणने शांतता प्रस्थापित केली नाही तर भविष्यात त्यांच्यावर होणारे हल्ले खूप मोठे असतील. पण अमेरिकेच्या सैन्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. आता आशा आहे की, आपल्याला आता त्यांच्या सेवा आणि या क्षमतेची गरज भासणार नाही."
https://platform.twitter.com/widgets.js#watch | "I want to congratulate the great American patriots who flew those magnificent machines tonight... Hopefully, we will no longer need their services and this capacity. I hope that so", says US President Trump after the US strikes Iran's three nuclear facilities amid the… pic.twitter.com/FVTycpLhgO
— ANI (@ANI) June 22, 2025
पश्चिम इराणमधील भागावर हवाई हल्ले, इस्रायलच्या लष्कराची माहिती
इस्रायल-इराणमधील संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. मात्र, या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झालेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या अनेक भागांना केलं लक्ष्य केलं आहे. दरम्यान, इस्रायलनेही पश्चिम इराणमधील लष्करी लक्ष्यांवर हल्ले सुरू केले असल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsThe IAF has begun a series of strikes toward military targets in Western Iran: Israel Defence Forces pic.twitter.com/9cReVXwXvc
— ANI (@ANI) June 22, 2025
“शिकारी ट्रम्प यांनी काम सुरू केलंय”, संरक्षण तज्ज्ञांकडून इराणवरील हल्ल्याचं विश्लेषण; म्हणाले, “इतिहासाची पुनरावृत्ती…”
इस्रायल व अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले करुन इराणचं मोठं नुकसान केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांची समाजमाध्यमांवरून माहिती दिली आहे. “अमेरिकन वायूदेलाने इराणमधील फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील तीन अणू प्रकल्पांना लक्ष्य केलं. हे हल्ले अचूक लक्ष्यभेद करणारे होते. यशस्वी हल्ले करून अमेरिकेची सर्व लढाऊ विमानं आता आता सुरक्षितपणे इराणच्या हवाई हद्दीबाहेर पडली आहेत”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
"आता आपली वेळ...", अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा स्पष्ट इशारा
इस्रायल-इराणमधील संघर्षात वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. मात्र, या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झालेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे प्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख करून देणारे हुसेन शरीयतमदारी यांनी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया देताना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, "आता विलंब न करता कारवाई करण्याची आपली वेळ आहे. आपण बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला पाहिजे", असं त्यांनी म्हटलं आहे.
Israel Iran conflict live updates : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, इस्रायलच्या अनेक भागांना केलं लक्ष्य
Israel Iran conflict live updates : इस्रायल-इराणमधील संघर्षात वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. मात्र, या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झालेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यानंतर आता इराणने पुन्हा एकदा उत्तर इस्रायलमधील अनेक भागांना लक्ष्य केलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली राज्य माध्यमांनी सांगितलं की, नेस झिओना, रिशोन लेझिओन आणि बंदर शहर हैफा येथे हल्ला झाला. या हल्ल्यात मध्य आणि उत्तर इस्रायलमधील अनेक भागांना फटका बसला आहे.
Israel Iran War : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा मोठा इशारा; परराष्ट्र मंत्री म्हणाले, "गंभीर परिणामांना…"
इराणने शांत बसावं किंवा विनाशाला सामोरं जावं-डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
इराण मागच्या चाळीस वर्षांपासून अमेरिकेच्या विरोधात कारवाया करतो आहे आणि कुरापती काढतो आहे. त्यामुळे आम्हाला इराणकडे असलेले अणु प्रकल्प उद्ध्वस्त करायचे होतेच. आता या असल्या कुरापती अमेरिकेला नको आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांचे अणु प्रकल्प उद्ध्वस्त केले. आता इराणने शांत बसावं. तसं झालं नाही तर इराणला भीषण विनाशाला सामोरं जावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. इराणने आता शांतता प्रस्थापित केली नाही तर यापेक्षाही भीषण हल्ले आगामी काळात होतील त्याचे जे परिणाम होतील त्याला सर्वस्वी इराण जबाबदार असेल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
US Airstrikes Iran : अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणमधील नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते? महत्वाची माहिती समोर
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने घेतला हा मोठा निर्णय़; हवाई क्षेत्र केलं बंद
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने हवाई क्षेत्र बंद केलं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून इस्रायलने आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. या संदर्भात इस्रायल विमानतळ प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असल्याचं वृत्त द टाईम्स ऑफ इस्रायलच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
Benjamin Netanyahu : अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया; नेतान्याहू म्हणाले, "इतिहास बदलेल…"
"...तर भविष्यातील हल्ले खूप मोठे असतील", इराणवरील हवाई हल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा मोठा इशारा
इस्रायल-इराणमधील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. हा हवाई हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, "अमेरिकन सैन्याने जे केले आहे ते कोणतेही सैन्य करू शकले नसते. जर इराणने शांतता प्रस्थापित केली नाही तर भविष्यात त्यांच्यावर होणारे हल्ले खूप मोठे असतील", असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
'अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "इतिहास..."
इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. हा हवाई हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली. दरम्यान, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणवर हल्ला करण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.
Israel Iran Conflict LIVE Updates : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
Israel Iran Conflict LIVE Updates : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले की अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य केले. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर लिहिले की, “आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणुस्थ प्रकल्पांवर यशस्वी हल्ले केले आहेत. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डो या प्राथमिक लक्ष्यावर संपूर्ण बॉम्ब पेलोड टाकण्यात आला आहे,” असे ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Ayatollah Ali Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींची ३ दशकांची राजवट संपणार? उत्तराधिकाऱ्यांची नावं केली जाहीर, मुलाचं नाव वगळलं
इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिका सहभागी, इराणमध्ये केला मोठा हल्ला, (फोटो-संग्रहित छायाचित्र)