येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची योजना आयसिस ही दहशतवादी संघटना आखत असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. आत्मघाती हल्लेखोराच्या सहाय्याने पंतप्रधानांवर हल्ला केला जाणार असून त्यासाठी आयसिसने १२ ते १५ वयोगटातील मुलांची निवड केली असल्याचे वृत्त आहे.
गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून निघताना सुरक्षा यंत्रणांना कोणतीही कल्पना न देता थेट लहान मुलांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न आयसिस करत आहे. त्यासाठी १२ ते १५ वर्षाची मुले स्फोटके आणि हत्यारांसह भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अलर्टनंतर मोदींच्या सुरक्षेतील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पूर्णपणे सतर्क झाला आहे.
लहान मुलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडिओ नुकताच आयसिसने प्रसिद्ध केला होता. याशिवाय आयसिससह इतर दहशतवादी संघटना लहान मुलांना अशाच प्रकारे प्रशिक्षण देत असल्याचेही समजते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2016 रोजी प्रकाशित
मोदींवर हल्ला करण्यासाठी १२ ते १५ वयोगटातील दहशतवादी भारतात दाखल
मोदींवर हल्ला करण्यासाठी आयसिसने १२ ते १५ वयोगटातील मुलांची निवड केली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 24-01-2016 at 16:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is suicide bombers aged 12 15 may target pm narendra modi