सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. कारण, या संघटनेशी संबंधित एका दाम्पत्याला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

दिल्लीचे पोलीस उपाध्यक्ष प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले, ओखलाच्या जामियानगरमधून एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जहानजेब सामी आणि हिना बशीर बेग अशी या नवरा-बायकोची नावं आहेत. या दोघांचा संबंध आयसिसच्या खुरासान मॉड्यूलशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे दाम्पत्य सीएएविरोधी आंदोलन भडकवण्याचं काम करीत होते, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राजधानी दिल्लीत सध्या अनेक ठिकाणी सीएए, एनआरसीविरोधात आंदोलनं सुरु आहेत. जामिया येथील शाहीन बाग भाग यांपैकी एक आहे. शाहीन बागेत आंदोलकांनी एक मुख्य रस्ता बंद केला आहे. नोएडा आणि दिल्लीला हा रस्ता जोडतो.