वृत्तसंस्था, बीजिंग/ वॉशिंग्टन

भारतात या आठवडय़ात होणाऱ्या ‘जी-२०’ गटाच्या शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग उपस्थित राहणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी निराश झाल्याची प्रतिक्रिया दिली. परिषदेला बायडेन उपस्थित राहणार आहेत.

जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ‘जी-२०’ शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व पंतप्रधान लि चियांग करतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला ही परिषद होणार आहे. याबाबत बायडेन म्हणाले की, जिनिपग यांच्या अनुपस्थितीमुळे अपेक्षाभंग झाला आहे, परंतु मी त्यांना भेटणार आहे. परिषदेला बायडेन यांच्यासह २४ जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>>‘एक देश, एक निवडणूक’ समितीकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय; मल्लिकार्जुन खरगे यांना डावलल्यामुळे काँग्रेस संतप्त

जिनिपग अनुपस्थित का?

’नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग सहभागी होणार नाहीत.

’त्यामुळे चिनी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पंतप्रधान लि चिआंग करतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोमवारी जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’परंतु जिनिपग या परिषदेला उपस्थित का राहणार नाही, याचे कारण मात्र त्यांनी दिले नाही.