मला खालिद जिवंत नकोय… मी तुम्हाला खालिदविषयी माहिती देईन, पण कोणत्याही परिस्थितीत त्याला जिवंत सोडू नका.. २० वर्षांची तरुणी रागाच्या भरात पोलिसांना सांगत होती.. जवळपास वर्षभरानंतर त्या तरुणीच्या निकटवर्तीयांनी पोलिसांना ‘टीप’ दिली आणि सोमवारी ‘जैश-ए -मोहम्मद’चा टॉप कमांडर अबू खालिदचा चकमकीत खात्मा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सकाळी बारामुल्ला येथील चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा काश्मीरमधील ऑपरेशनल कमांडर अबू खालिदला कंठस्नान घालण्यात आले. आता खालिदविषयी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार खालिदचे २० वर्षांच्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. यातून तरुणी गर्भवती राहिली. गर्भवती असल्याचे ऐकून खालिदला आनंद होईल, असे तिला वाटत होते. मात्र तिचा अंदाज खोटा ठरला. गर्भातील बाळाशी माझा काहीच संबंध नाही, असे सांगत खालिदने तिच्याशी संबंध तोडले.

खालिदने दगा दिल्यावर तरुणी तिच्या भावासह पंजाबमधील जालंधर येथे गेली. तिथे गर्भपात केल्यावर ती पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये परतली. स्वगृही परतल्यावर तिने खालिदला संपवण्याची शपथच घेतली. कुपवाडा, बारामुल्ला, सोपोर या भागांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये खालिदचा सहभाग असल्याने तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरही होता. राज्यात दहशतवादी कारवाया सुरु ठेवतानाच खालिदने स्वतःची ‘लव्हर बॉय’ प्रतिमा कायम ठेवली. शेवटच्या काही दिवसातही त्याच्या तीन ते चार प्रेयसी होत्या, असे समजते.

संबंधित तरुणीने सुरक्षा यंत्रणाना खलिदच्या ठिकाणाविषयी अचूक माहिती दिली. पोलीस तिथे पोहोचलेही होते, मात्र तोपर्यंत खलिद तिथून पळून गेला होता. काही दिवसांपूर्वी तरुणीच्या नातेवाईकांनी खलिदविषयीची ‘टीप’ पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक त्याच्यावर नजर ठेवून होते. सोमवारी एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी खलिद आला असताना सुरक्षा यंत्रणांनी त्याला गाठले आणि चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir love dhoka and encounter story behind killing of jaish e mohammad commander khalid
First published on: 09-10-2017 at 17:18 IST