काश्मीरचे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचे हत्या प्रकरण शमते न शमते तोच भाजपा आमदार लाल सिंह चौधरी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा ओळखून वागले पाहिजे. तुम्हाला माहित आहे शुजात बुखारींसोबत काय झाले? काश्मीरमधल्या पत्रकारांनी एक चुकीचे वातावरण निर्माण केले होते. आता मी काश्मीरच्या पत्रकारांना सांगेन की मर्यादेत राहा, आपला बंधुभाव जपा. एक मर्यादा तुमची तुम्हीच आखून घ्या म्हणजे तुमच्यातली एकी कायम राहिल असे वक्तव्य चौधरी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपावर टीका केली आहे. पत्रकार बंधूंनो तुम्हाला भाजपा आमदाराकडून धमकीच मिळाली आहे. शुजात बुखारी यांचा मृत्यू हे आता गुंडगिरी करणाऱ्यांसाठी पत्रकारांविरोधातले हत्यार झाले आहे की काय अशीच स्थिती आहे अशा आशयाचे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची १४ जूनला श्रीनगरमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली. प्रेस कॉलनीमध्ये असलेल्या आपल्या कार्यालयातून बुखारी हे एका इफ्तार पार्टीसाठी चालले होते. त्यावेळी त्यांना गोळ्या मारून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा देशभरातून निषेध झाला. आता भाजपा आमदारांनी या हत्येवरूनच पत्रकारांनी मर्यादा पाळली पाहिजे असे म्हटले आहे. दरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे लाल सिंह चौधरी यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu bjp leader warns kashmiri journalists of shujaat bukhari type consequences
First published on: 23-06-2018 at 15:50 IST