Jammu Kashmir Pahalgam Terror Attack couple Last video: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे संशयित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची दुर्घटना घडण्याच्या काही तास आधी कर्नाटकातील एका जोडप्याच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील एक कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. यावेळी मंजूनाथ यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. तर त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा मुलगा हल्ल्यातून बचावले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.

शिवमोगा जिल्ह्यातील विजयनगर येथील रहिवासी मंजुनाथ राव (४७) हे त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा लहान मुलगा अभिजय यांच्यासोबत कश्मीरमध्ये फिरायला आलेले असताना हल्ल्यात ठार झाले. मात्र सध्या समोर आलेल्या शेवट्या व्हिडीओमध्ये ते काश्मीरचं कौतुक करताना दिसत आहेत.हे जोडपे शांततापूर्ण बोटीतून प्रवास करताना दिसत आहे आणि ते नयनरम्य काश्मीर खोऱ्यातील त्यांच्या अनुभवांचे वर्णन करत आहेत. “काश्मीरी लोकांनी केलेलं स्वागत पाहून भारावून गेलो आहोत असंही ते व्हिडीओमध्ये म्हणत आहेत, मात्र यानंतर काहीच वेळात त्यांचा हा व्हिडीओ शेवटचा ठरला.

पाहा व्हिडीओ

पहलगाममधील एका रुग्णालयातून स्थानिक वृत्तवाहिन्यांशी फोनवरून बोलताना, पल्लवीने तिच्या पतीच्या मृत्यूपूर्वीच्या भयानक क्षणांची आठवण करून दिली. पल्लवी म्हणाली की, मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका…यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा…ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असं दहशतवादीने सांगितले, असं पल्लवी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.