जम्मूमध्ये अंतरराष्ट्रीय सिमेवरील सांबा येथील सैन्याच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेला हल्ला पुर्वनियेजित व व्यावसायीक प्रशिक्षण दिलेल्या अतिरेक्यांनी केल्याची बाब समोर आली आहे. अतिरेक्यांना हल्ला करण्यापूर्वी व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे हल्ला करण्याच्या पद्धतीवरून समोर आले आहे.
शांततेवर हल्ला ; चार पोलीस व तीन जवानांसह दहा ठार

हल्लेखोर अतिरेक्यांना फक्त सैनिकी प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते, तर त्यांना गुप्तचर संघटनांकडून अनेक बारकाव्यांसह माहिती पुरवण्यात आली असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय सैन्याचे अनेक अधिकारी राहत असलेले ठिकाण व त्यांच्या कुटुंबांना या हल्ल्यामध्ये लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये लेफ्टनंट कर्नल विक्रमजी सिंग यांच्या पत्नीचा अतिरेक्यांची गोळी लागून मृत्यू झाला.
सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे या अतिरेक्यांनी फक्त ‘१६ कॅव्हलरी’ या एकाच युनिटला लक्ष केले होते. सांबामध्ये सैन्याचे अनेक कँप आहेत. मात्र, अतिरेक्यांनी ठरवून ‘१६ कॅव्हलरी’ वरच हल्ला केला.
शांतता प्रक्रिया सुरूच राहील

गेल्या दशकभरामध्ये या भागातील कोणत्याही लष्कराच्या छावणीवर अतिरेकी हल्ला झाला नव्हता. सांबामधील या लष्करी छावणीच्या प्रवेश द्वारावरील सुरक्षा व्यवस्था बऱ्याच प्रमाणात ढिली होती. केवळ एक जवान या प्रवेश द्वारावर पहाऱ्यासाठी असायचा. या पाहारेकऱ्याला मारल्यानंतर अतिरेक्यांनी भिंतीमरून उड्यामारून छावणीचे स्वयंपाक घर गाठले आणि निशस्त्र जवाणांवर गोळीबार केला.             
पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलीसोबत छावणीतील सैन्याच्या खानावळीला लागून अलणाऱ्या निवासस्थानामध्ये राहणारे लेफ्टनंट कर्नल सिंग सकाळी ७.३० वाजता गोळीबारीचा आवाज ऐकून घराबाहेर आले. अतिरेक्यांनी बेसावध व निशस्त्र सिंग यांच्या पोटावर गोळ्या झाडल्या. राहत्या घराच्या काही मिटर अंतरावर अतिरेक्यांनी कर्नल सिंग यांची हत्या केली.