जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दोन जवान जखमी आहेत.
कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत एक जवान हुतात्मा झाला तर निमलष्करी दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती लष्कर अधिका-यांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना दहशतवादाच्या एका समूहाने गोळीबार केला. रागणी चौकीजवळ शनिवारी संध्याकाळी या चकमकीला सुरुवात झाली. दहशतवाद्यांबरोबर अद्याप चकमक सुरू असून, अधिक सुरक्षा रक्षक घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.