ट्रेनमध्ये अंडरवेअरमध्ये दिसले नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार; स्पष्टीकरण देत म्हणाले…

जेडीयूचे आमदार गोपाल मंडल तेजस राजधानी एक्सप्रेसच्या एसी फर्स्ट क्लासच्या डब्यात पाटण्याहून दिल्लीचा प्रवास करत होते.

mla
ट्रेनमध्ये अंडरवेअरमध्ये दिसले नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाचे एक आमदार रेल्वे प्रवासात चक्क अंडरवेअरमध्ये फिरताना दिसले. या प्रकरणाची माहिती त्यांच्या सहप्रवाशांनी दिली. जेडीयूचे आमदार गोपाल मंडल तेजस राजधानी एक्सप्रेसच्या एसी फर्स्ट क्लासच्या डब्यात पाटण्याहून दिल्लीचा प्रवास करत होते. यावेळी ते फक्त अंडरविअर आणि बनियनवर होते. ही घटना गुरुवारी घडली.

आमदार मंडल यांच्या या वर्तणुकीवर त्यांच्या सहप्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रकार भांडणापर्यंत जाऊन पोहोचला. रेल्वे पोलीस दल (आरपीएफ) आणि तिकीट परीक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला. याप्रकरणी पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली. “सहप्रवाशांनी आमदारांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस आणि तिकीट परीक्षकाने दोन्ही पक्षांची समजूत काढली, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आमदार मंडल यांचे रेल्वेत अंडरविअर घालून फिरतानाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. आमदार असलेल्या व्यक्तीने प्रवासात असं फिरल्यावरून टीकाही झाली. त्यानंतर आमदारांनी झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय. मंडल यांनी असं फिरण्याला त्यांच्या पोटाला दोष दिला. ते म्हणाले, की “मी ट्रेनमध्ये चढताच माझं पोट बिघडलं, त्यामुळे मी अंडरविअर आणि बनियनवर फिरत होतो, मी खोटं बोलत नाहीए.”

आमदार मंडल यांचे रेल्वेत अंडरविअर घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jdu mla gopal mandal is seen in underwear in ac first class compartment of tejas rajdhani express hrc

ताज्या बातम्या