करोना आणि लॉगडाउनमुळे शिक्षण क्षेत्राचं वेळापत्रकचं कोलमडलं आहे. अनेक राज्यांनी शालेय परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे जेईई आणि नीट परीक्षांचं काय असा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात पडला होता. अखेर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेईई मेन परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई अॅडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ ही २६  जुलै रोजी होणार असून, सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्यीची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

देशभरातील लाखो विद्यार्थी या परिक्षांच्या ताराखांच्या प्रतिक्षेत होते. मात्र करोनारुपी संकटामुळे आतापर्यंत याबाबत निर्णय होत नव्हता. आज केंद्रीयमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक हे वेबिनारच्या माध्यामातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना देशभरातील विद्यार्थांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेला प्रवेशासाठी ‘नीट’ आणि ‘जेईई’ मेन्स सारख्या परीक्षा देतात. या वर्षी देखील अशाचप्रकारे लाखो विद्यार्थ्यांना या परिक्षेची प्रतिक्षा होती. मात्र आता तारखा घोषित झाल्याने त्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee mains from july 18 23 jee advanced in aug pokhriyal msr
First published on: 05-05-2020 at 14:10 IST