मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालट झाली. त्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून विश्वासदर्शक ठराव मांडला होता. तो त्यांनी जिंकलाही आहे. मात्र, या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांचे बंधू आमदार बसंत सोरेन दिल्ली दौऱ्यावर होते. यावरती त्यांना विचारण्यात आले असता, त्यांच्या उत्तराने सर्वंच जण चक्रावून गेले आहेत.

झारखंडमधील सरकारवर राजकीय संकट निर्माण झाले होते. तेव्हा तुम्ही दिल्लीला कोणत्या कामासाठी गेले होता?, असा सवाल पत्रकारांनी आमदार बसंत सोरेन यांना विचारला. त्यावर त्यांनी एकदम हास्यास्पद उत्तर दिलं आहे. “माझ्याकडे अंतर्वस्त्रं नव्हती. ते खरेदी करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. राज्यात थोड्या राजकीय घडमोडी घडल्या होत्या. मात्र, आता सर्वकाही ठिक आहे,” असे उत्तर सोरेन यांनी दिल्याने एकच हास्यकल्लोळ उडाला.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

बसंत सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे छोटे भाऊ आहेत. ते दुमक येथील जेएमएम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ज्या खाणकाम घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू आहे. त्याच प्रकरणात बसंत सोरेन यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी २९ ऑगस्टला बसंत सोरेन सर्वोच्च न्यायालयात गेले होते.