अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्लादिमीर पुतीन यांना निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी “किंमत मोजावी लागणार” असे वक्तव्य केले होते. यानंतर रशियाने बुधवारी आपल्या अमेरिकेतील राजदूताला सल्लामसलत करण्यासाठी पुन्हा मॉस्कोला बोलावले आहे. या निवडणुकीमुळे अमेरिकेत राजकीय तणाव निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बायडेन यांना अमेरिकेच्या गुप्तचर अहवालाविषयी विचारले गेले होते. यामध्ये नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकीत रशियन नेत्याने बायडेन यांच्या उमेदवारीला हानी पोहचविण्याचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता.

“त्यांना याची किंमत मोजावी लागेल,” असे ७८ वर्षीय बायडेन यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हेली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांच्या विष दिल्याच्या आरोपाखाली पुतीन हे “दोषी” आहेत का, असे विचारले असता बायडेन म्हणाले की, हो मी मानतो की ते दोषी आहेत.”

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने घोषित केले की, नॅव्हेली यांना विष दिल्याबद्दल शिक्षा म्हणून रशियावर लागू करण्यात आलेली निर्यातबंदी कठोर होती.

प्रत्युत्तरा दाखल रशियाने आपल्या राजदूताला घरी बोलावून घेतले आहे आणि संबंधांमध्ये काही“अपरिवर्तनीय बदल” होवू नये यावर भर दिला आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “वॉशिंग्टनमधील रशियन राजदूत एनाटोली अँटोनोव्ह यांना अमेरिकेबरोबरच्या संबंधांच्या संदर्भात काय केले पाहिजे याचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने मॉस्कोला येण्यास आमंत्रित केले आहे.”

रशियाचे उप-परराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी आरआयए नोव्होस्ती यांना सांगितले की, रशिया-अमेरिका संबंध आणखी बिघडण्याची जबाबदारी पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे.”

वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र विभागाने रशियाच्या या कारवाईची दखल घेतली आहे आणि म्हटले आहे की, अमेरिका रशियाने निर्माण केलेल्या आव्हानांवर स्पष्ट नजर ठेवेल.”

व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांना पत्रकारांनी विचारले होते की बायडेन पुतिन यांना खरोखर हत्यारा मानतात की केवळ रूपक म्हणून.

निवडणुकीत ढवळाढवळ, नॅव्हेली यांना विषबाधा, सायबरअॅटॅक आणि अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्यदलाची परिस्थिती दाखवून साकी म्हणाले की, आम्हाला काय वाईट आणि समस्या निर्माण करणाऱ्या गोष्टी समजतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jo biden says putin has to pay the prize russia recalls its envoy from us sbi
First published on: 18-03-2021 at 12:18 IST