scorecardresearch

जॉनसन अँड जॉनसन कंपनीकडून भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे!

अमेरिकन कंपनी जॉनसन अँड जॉनसननं भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारतीय औषध नियंत्रण मंडळानं ही माहिती दिली आहे.

johnson-and-johnson
जॉनसन अँड जॉनसन कंपनीकडून भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे! (Photo-AP)

अमेरिकन कंपनी जॉनसन अँड जॉनसननं भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारतीय औषध नियंत्रण मंडळानं ही माहिती दिली आहे. जॉनसन अँड जॉनसननं एप्रिल महिन्यात लस ट्रायलसाठी प्रस्ताव दिला होता. प्रस्ताव मागे घेण्याचं कारण अद्याप कंपनीने स्पष्ट केललं नाही. सध्यातरी भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. दुसरीकडे मॉडर्ना, फायझरसह अन्य लसी प्रतिक्षेत आहेत. मात्र अजूनही या लसींना मंजुरी मिळालेली नाही.

जॉनसन अँड जॉनसन जगप्रसिद्ध कंपनी आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत प्रोडक्ट बनवण्याचं काम करते. करोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जॉनसन अँड जॉनसन कंपनीने प्रस्ताव मागे घेतल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसणार आहे. “विदेशी लस निर्मिती कंपन्यांसोबत चर्चा करण्यासाठी एका समितीचं गठन केलं आहे. बॉण्डसहित अन्य मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. यात फायजर, मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा समावेश आहे”, असं काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितलं होतं.

लसोत्सव, विक्रमी जीएसटी भरणा, सिंधू व हॉकी संघाचा विजय… सगळ्याची सांगड घालत मोदींचं ट्विट; म्हणाले…

देशात आतापर्यंत ४७ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यात १० कोटी लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. देशात दररोज सरासरी ५० लाख लसीचे डोस दिले जात आहेत. करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे. गेल्या सलग सहा दिवसांपासून ४० हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४०,१३४ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ करोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. केरळमध्ये सर्वाधिक २०,७२८ नवीन बाधित आढळून आले आहेत. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,९४६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 16:40 IST

संबंधित बातम्या