मी रस्त्यावर उभी राहून ओरडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी योग शिकण्यात व्यस्त होते. त्यांना फिरण्यातून वेळच मिळत नाही, देशात काय चाललेय याची त्यांना माहितीच नाही. कायदा व्यवस्था आणि प्रशासन अजूनही आमचे दुःख समजू शकलेले नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या निर्भयाच्या आईने दिली आहे. तसेच, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी सकाळीच सर्वोच्च न्यायालयात दाद का मागितली नाही, असा सवाल निर्भयाच्या आईने केला असून, ही निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे.
‘निर्भया‘ सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख गुन्हेगाराची आज सुटका होणार आहे. यासंबधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी उद्या होणार आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तत्कालीन अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला विरोध करत दिल्ली महिला आयोगाने शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र दोषीच्या सुटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार तर दिला आणि याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होईल असे स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2015 रोजी प्रकाशित
प्रशासन अजूनही आमचे दुःख समजू शकलेले नाही – निर्भयाची आई
मी रस्त्यावर उभी राहून ओरडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी योग शिकण्यात व्यस्त होते.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 20-12-2015 at 13:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juveniles release dcw files special leave petition sc refuses to give urgent hearing