लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी झालं निधन

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ३९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे शनिवारी बंगळूरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा अखेरचा चित्रपट ठरला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kannada actor chiranjeevi sarja dies at 39 in bengaluru avb