दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणाऱ्या अध्यादेशामुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर बुधवारी माकपचे सरचिटणीस प्रकाश करात आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांनी चर्चा केल्याचे समजते. मुलायमसिंग यांची करात यांनी बुधवारी येथे भेट घेतली.
तथापि, निधर्मी तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे माकपच्या सूत्रांनी सांगितले. येत्या ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीत ही परिषद होणार आहे. लोकशाहीवादी डावे पक्ष आणि निधर्मी शक्ती जातीयवादाविरोधात लढण्यासाठी एकत्रित येण्याचे संकेत मिळत असून त्यासाठीच या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणाऱ्या अध्यादेशामुळे देशातील राजकीय स्थितीवरही दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाल्याची अटकळ बांधण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
राजकीय स्थितीबाबत करात-मुलायमसिंग चर्चा
दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणाऱ्या अध्यादेशामुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर बुधवारी माकपचे सरचिटणीस प्रकाश करात आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांनी चर्चा केल्याचे समजते.

First published on: 03-10-2013 at 12:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karat meets mulayam to discuss political situation