Kerala floods. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे सध्या जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्तळीत झालं आहे. निसर्ग या समृद्ध राज्यावर असा काही कोपला आहे की अनेकांनीच आता त्यापुढे हात टेकले आहेत. राज्यातील जवळपास ३५ धरणं भरली असून आता परिस्थिती आणखीनच चिघळताना दिसत आहे. भारतामध्ये विविध ठिकाणी सध्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पण, केरळमध्ये मात्र यामुळे जास्त नुकसान झाल्याचं स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या राज्यावर आलेलं हे संकट पाहता मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही इतरांना सढळ हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान करण्याची विनंती केली. आपल्या राज्यातील जनतेचं आयुष्य पुन्हा एकदा स्थिरस्थावर करण्यासाठी ते प्रयत्नशील असून, त्यांना आता अनेकांचीच साथ लाभत आहे. यामध्ये कलाकार मंडळीही मागे नाहीत. केरळ आणि बॉलिवूड कलाविश्वातूनही सेलिब्रिटींनी आपली जबाबदारी जाणत स्थानिकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि ‘अम्मा’ म्हणजेच ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टीस्ट्स’च्या अध्यक्षपदी असणाऱ्या अभिनेता मोहनलालने पूरग्रस्तांसाठी २५ लाख रुपयांची मदत केली आहे. त्यासोबतच अभिनेता ममूथीनेही २५ लाखांची मदत केली असून, या दोन्ही कलाकारांनी जवळपास ५० लाखांचा मदनिधी दिला आहे.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

अभिनेता तोविओ थॉमस याने त्रिसूर भागातील त्याच्या घरातच पूरग्रस्तांना आसरा दिल्याचं कळत आहे. जेथे पूरग्रस्तांलाकाही सोयीसुविधाही पुरवण्यात येत आहेत. अभिनेता सिद्धार्थनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत, याचना करत केरळवासियांच्या मदतीसाठीचं आवाहन केलं आहे. अभिनेता विजय सेतुपती, अल्लू अर्जुन यांही पूरग्रस्तांच्या मदतनिधीमध्ये २५ लाखांची मदत केली आहे.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

‘सन टीव्ही’ या वाहिनीकडूनही केरळातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शुक्रवारीच केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी ही मदत देऊ केली. यामध्ये अभिनेता धनुषही मागे राहिलेला नाही. सध्याच्या घडीला सर्वच स्तरांतून केरळच्या दिशेने मदतीचा ओघ सुरु झाला असून, प्रत्येकानेच या राज्यावर आलेलं हे संकट आतातरी टळावं आणि परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात यावी अशी प्रार्थनाही केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala floods heres how malayalam and other celebrities are contributing to relief efforts
First published on: 18-08-2018 at 13:09 IST