फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या शेकडो लोकांवर गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंदूर जिल्ह्यातील मलाप्पूरम येथील पुंगूड येथे हा अपघात घडलाय. या घटनेत तब्बल २०० लोक जखमी झाले असून यामध्ये पाच जणाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी रात्री ९ वाजता ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्यातील मलाप्पूरममधील पुंगुड येथे दोन संघादरम्यान फुटबॉलचा अंतिम सामना खेळवला जाणार होता. हा सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक जमले होते. प्रेक्षकांना बसण्यासाठी येथे तात्पूरत्या स्वरुपातील प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. शनिवारी सामना सुरु होण्यापूर्वी पूर्ण गॅलरी प्रेक्षकांनी गच्च भरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र सामना सुरु होण्याआधी गॅलरी कोसळली. या अपघातात गॅलरीवर बसलेले शेकडो प्रेक्षक खाली कोसळले. यामध्ये एकूण २०० च्या आसपास लोक जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुटबॉलचा अंतिम सामना पाहण्यासाठी तब्बल दोन हजार लोक जमले होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.