Kerala travel vlogger viral video : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील एक ट्रॅव्हल व्लॉगर महीन शाजहान याच्यावर सध्या चांगलीच टीका केली जात आहे. या व्लॉगरने स्वतःचा परदेशी नागरिकांबरोबर एका हिंदू मंदिरात जाऊन त्यांच्या कपाळावर सिंदूर लावतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत. अनेकांनी ही कृती अयोग्य आणि हिंदू परंपरांचा अपमान करणारी असल्याचे म्हटले आहे.

शाजहान याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (@hitchhiking.nomad) २५ मे रोजी पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या मित्रांबरोबर मंदिरात प्रवेश करताना आणि त्याच्या मित्राचे स्वागत कपाळावर ‘सिंदूर’ लावून करताना दिसत आहे.

या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिले आहे ज्यामध्ये तो म्हणतो की, “केरळच्या मंदिरात एक मुस्लिम मुलगा; केरळमध्ये श्रद्धा ही अडथळा ठरत नाही तर तो एक जोडणारा पूल आहे. एका हिंदू मंदिरात परदेशी मित्रांना घेऊन जाणारा मुस्लिम मुलगा म्हणून मी दुसरं काही नाही तर फक्त ऊबदारपणा, स्वागत आणि शांतता अनुभवली. भारताच्या या हिरव्यागार कोपर्‍यात धार्मिक सलोखा ही निव्वळ एक कल्पना राहत नाही, तर ते दररोज अवलंबले जाते. आम्ही आदर करतो. आम्ही उत्सव साजरा करतो. आम्ही वाटून घेतो. वेगवेगळे मार्ग, एक प्रेम.”

मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर यावर टीका केली जात आहे, अनेक नेटकऱ्यांनी त्याला हिंदू परंपरेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सिंदूर हा पारंपारिकपणे विवाहित हिंदू महिला लावतात, सिंदूर लावणे ही प्रथा प्रतिमात्मक मानली जाते आणि कोणत्याही संदर्भाशिवाय तो लावला जात नाही.

शाहजान काय म्हणाला?

Brut India याला दिलेल्या प्रतिक्रेयदरम्यान शाजहान याने त्याच्या व्हिडीओमध्ये कोणत्याही महिलेने या कृतीवर आक्षेप घेतला नाही असे स्पष्ट केले आहे. एका व्हिडीओमध्ये शाजहान म्हणाला की, “मला चांगले माहिती आहे की विवाहित महिला हे (सिंदूर) लावातात पण मला हे माहिती नव्हते की ही इतकी महत्त्वाची बाब आहे आणि दुसरा कोणही व्यक्ती तो लावू शकत नाही. जर मला माहिती असते तर मी ते केले नसते कारण मी ट्राव्हलर आहे आणि जरी कोणताही धर्म मानत नसलो तरी मी सर्व धर्मांचा आदर राखण्याचा प्रयत्न करतो.”

काही जण त्याच्या व्हिडीओचा गैरवापर जातीय तणाव वाढविण्यासाठी करत आहेत, असेही त्यांनी म्हटले. याबरोबरच त्याने या कृतीमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची माफी मागितली.

शाजहान याने असेही स्पष्ट केले की तो त्याच्या मित्रांबरोबर मंदिरात गेला तेव्हा तेथील पुजाऱ्याने त्याला पुजेचे ताट दिली ज्यामध्ये सिंदूर देखील होता. जेव्हा त्याने मित्रांच्या कपाळावर सिंदूर लावला तेव्हा त्याचे हिंदू मित्र देखील उपस्थित होते आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान Brut India ने व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांची मते कमेंटमध्ये मांडली आहेत. शाहजान याने देखील या व्हिडीओखाली कमेंट केली आहे. “शांतता, शांतता, शांतता. मी कधीही कोणत्याही धर्माला दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. एक मल्याळी म्हणून मला केरळमधील कोणत्याही धार्मिक ठिकाणी कुठल्याही अडचणीशीवाय प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यावरून मला कधीही टीकेचा सामना करावा लागला नाही. आम्ही शांतते राहतो. दुर्दैवाने काळ बदलला आहे आणि सध्या राजकारणाने लोकांना विभागले आहे,” असे त्याने लिहीले आहे.