अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी शनिवार ( १८ मार्च ) खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमृतपाल सिंह याच्यासह सह जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई केल्यानंतर पंजाबमधील अनेक ठिकाणी इंटरनेटसेवा उद्यापर्यंत ( १९ मार्च ) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज ( १८ मार्च ) सकाळी अमृतपाल सिंह हा त्याच्या सहकाऱ्यांसह शाहकोटजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पंजाब पोलिसांच्या ५० गाड्या त्यांच्या मागावर होत्या. अखेर जालंदरच्या नकोदरजवळ सिंह याला साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर पंजाबमधील परिस्थिती चिघळू नये, यासाठी इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.

हेही वाचा : विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीचा आरोप, अमित शाहांचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले…

पंजाबच्या गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील काही ठिकाणांची इंटरनेट, एसएमस सेवा ( बँक आणि मोबाईल रिचार्ज वगळून ) १८ मार्च ते १९ मार्च बंद ठेवली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील वरिंदर सिंह यांनी लवप्रीत सिंह, अमृतपाल सिंह यांच्यासह ३० जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लवप्रीतसह एकाला पोलिसांनी अटक केली होती. पण, पोलिसांनी एकास सोडून देत लवीप्रतला जेलमध्येच ठेवलं होतं.

हेही वाचा : “माझी पत्नी घरात एकटीच”, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, “पोलिसांनी घरात घुसून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवप्रीतला सोडण्यासाठी अमृतपालने पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांसह जात धमकी दिली. यावेळी अमृतपालचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले होते.