PM Narendra Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. बायडन दाम्पत्याने त्यांना खास स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. स्नेहभोजनासाठी मोदी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारत -अमेरिकेतील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी भाष्य केलं.

“जसजसा वेळ निघून जातोय, आपल्या लोकांमध्ये एकमेकांप्रती समज अजून वाढत जातेय. एक दुसऱ्यांची नावे योग्यप्रकारे उच्चारली जात आहेत. भारतातील मुलं हॅलोविनच्या दिवशी स्पायडर मॅन बनतात तर, आणि अमेरिकेतील तरुण नाटू नाटूवर डान्स करतात”, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा >> पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात व्हाईट हाऊसमधून संयुक्त निवेदन, मोदी-बायडेन म्हणाले…

“भारतीय मूल्य, भारतीय लोकशाहीची परंपरा, भारतीय संस्कृतीला अमेरिकेत मान-सन्मान मिळाला आहे.अमेरिकेचा सर्वसमावशक समाज आणि अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यात भारतीय अमेरिकनांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे”, असंही मोदी म्हणाले.

“भारत आणि अमेरिकेतील लोकांच्या उपस्थितीमुळे ही संध्याकाळ खास बनली आहे. ही आमची सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे. जेव्हा आपण जपानमध्ये शिखर परिषदेमध्ये भेटलो होतो, तेव्हा तुम्ही एका समस्येचा उल्लेख केला होता. पण मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या समस्येचे निराकरण कराल”, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा >> “दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू, तो मोडून काढण्यासाठी…” अमेरिकन संसदेत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी फर्स्ट लेडी जिल बायडन यांचेही आभार मानले. ही भेट यशस्वी होण्याकरता जिल बायडन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने मोदींनी त्यांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन यांच्यासह चिअर अपही केले. उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आनंद, स्वातंत्र्य, समानता आणि भारत-अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी मोदींनी हे चिअर्स केले.