मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी वादातील मशीद समितीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१९ मार्च) फेटाळली. वादाशी संबंधित १५ खटले एकत्र करून त्यांची एकत्रित सुनावणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मस्जिद समितीने विरोध केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयातच ठेवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे बांधण्यात आलेल्या शाही इदगाह मशिदीबाबतचा वाद बराच जुना आहे, त्यावर उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.

मथुरा जिल्हा न्यायालयाकडून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याविरुद्ध मशिदीच्या बाजूची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मशीद समितीच्या त्या याचिकेवर एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे. आजचे प्रकरण १८ पैकी १५ प्रकरणे एकत्रित करण्याच्या विरोधात होते. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केलेला नाही. कोर्टात या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishna janmabhoomi shahi idgah dispute sc dismisses masjid committees plea against allahabad hc order sgk
First published on: 19-03-2024 at 14:44 IST