कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय संपादीत केला. तर, भाजपा आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांना पराभवाचा सामना करावा लागला. कर्नाटकात काँग्रेसला १३५ जागा, भाजपाला ६६ आणि जेडीएसला १९ जागांवर समाधान मानावे लागलं आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं आहे. ते ‘एएनआय’शी बोलत होते.

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जेडीएस भाजपाबरोबर युती करणार का? यावर कुमारस्वामी यांनी सांगितलं की, “आमची प्राथमिकता आमचा पक्ष स्वत:च्या ताकदीवर पुढे नेण्यावर आहे. पुढे काय होते पाहूया…”

हेही वाचा : ऐन निवडणुकीआधी राजस्थान काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? सचिन पायलट नवा पक्ष काढण्याच्या तयारीत?

“राष्ट्रीय पक्षांना वाटत असेल जेडीएस संपली आहे. पण, आम्ही आमचा पक्ष मजबूत करू. काँग्रेसच्या कामगिरीबद्दल मला माहिती आहे. ते कोणत्या पद्धतीने सरकार चालवणार आहे, याचीही मला कल्पना आहे,” असं कुमारस्वामींनी सांगितलं.

हेही वाचा : “हे खोटं आहे”, ओडिशा अपघाताबाबत काँग्रेसचा ‘तो’ दावा IRCTCनं खोडून काढला, आकडेवारी केली सादर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही १९ जागा जिंकल्या. राष्ट्रीय पक्षांना वाटत असेल की जेडीएला त्यांनी संपवलं आहे. मात्र, ते स्वप्न पाहत आहेत. काँग्रेसच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. भाजपाचे जे केलं तेच काँग्रेस करत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत काँग्रेसचं सत्य समोर येईल,” असेही कुमारस्वामी म्हणाले.