Kuwait Fire : कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहात असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ४२ भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत किमान ५० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला रवाना झाले आहेत. पंतप्रधानांनी मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी अकस्मात मृत्यूप्रकरणी टाहो फोडला आहे.

मृतांमध्ये बहुसंख्य भारतीय नागरिक असून ते २० ते ५० वर्षे वयोगटातील असून ते खाजगी कंपनीत काम करत होते, असे अरब टाइम्सने वृत्त दिले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीत १९५ कामगार होते. या मृत कामगारांच्या नातेवाईंकांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला आहे.

मुलीच्या यशाचा अभिमान

४८ वर्षीय वडाक्कोट्टुविलायल लुकोस हे एनबीटीसी समूहाचे पर्यवेक्षक होते. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के.जी. अब्राहम, केरळमधील व्यापारी आहेत. लुकोस हे कोल्लममधील अदिचनल्लूर पंचायतीचे रहिवासी आहेत आणि गेल्या १८ वर्षांपासून ते कुवेतमध्ये होते. “ते पुढच्या महिन्यात त्यांची मोठी मुलगी, लिडिया हिच्या कॉलेज ऍडमिशनसाठी घरी येणार होते. तिने सर्व विषयांमध्ये ए-प्लससह बारावी उत्तीर्ण केली होती. ल्युकोस यांना तिच्या निकालाचा अभिमान होता. कुवेतला जाण्यापूर्वी ते घरी आले होते”, असं पंचायतीचे सदस्य एल शाजी म्हणाले. वडाक्कोट्टुविलायल लुकोस यांच्या पश्चात त्यांची पत्नी शायनी, गृहिणी आणि दोन मुली आहेत.

घर घेतलं पण…

आणखी एक पीडित ३३ वर्षीय के रंजित हा NBTC मध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्याच्या एका मित्राने सांगितले की, कासारगोड येथील चेरकाला येथील रंजीत रजेवर होता. तो घरी जाणार होता, पण तिकीट कन्फर्म होऊ न शकल्याने तो लेबर कॅम्पमध्येच थांबला. रंजीत हा बॅचलर असून तो गेल्या १० वर्षांपासून कुवेतमध्ये होता. व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेला रंजित अकाउंटंट पदापर्यंत जाण्यापूर्वी एनबीटीसीच्या कॅटरिंग विभागात सामील झाला. “दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्याने भारतात नवीन घर बांधले होते तेव्हा तो घरी आला. यावेळी परत आल्यावर तो लग्न करण्याचा विचार करत होता.” रंजितच्या पश्चात वडील रवींद्रन, आई रुग्मिनी आणि दोन भावंडे असा परिवार आहे.

३० वर्षीय शमीर उमरुदीन यानेही या आगीत जीव गमवावा लागला. मूळचा कोल्लममधील सस्थमकोट्टाचा रहिवासी, तो एनबीटीसी ग्रुपमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो गेल्या पाच वर्षांपासून या फर्ममध्ये नोकरीला असल्याचे त्याचे नातेवाईक सावद यांनी सांगितले. “कुवेतला जाण्यापूर्वी तो कोल्लममध्येही ड्रायव्हर होता. शमीरने आठ महिन्यांपूर्वी केरळला भेट दिली होती. कुवेतमध्ये काम करणाऱ्या एका नातेवाईकाने आम्हाला या शोकांतिकेची माहिती दिली आणि त्याचा मृतदेह ओळखला”, असं सावद म्हणाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुरुमी आणि आई-वडील उम्मरुदीन आणि सबीना असा परिवार आहे. “त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि कुटुंब चालवण्यासाठी तो धडपडत होता”, असंही सावद म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमधील आणखी एक पीडित ५८ वर्षीय पोनमलेरी केलू एनबीटीसीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. दशकभरापूर्वी कुवेतला जाण्यापूर्वी, कासारगोड येथील त्रिकारीपूर येथील रहिवासी केलूने भारतातील विविध कंपन्यांमध्ये काम केले होते. त्यांची पत्नी केएन मणी कासारगोडच्या पीलीकोड येथील पंचायत कार्यालयात लिपिक म्हणून काम करते. या जोडप्याला दोन मुले आहेत.