काबूलमध्ये शुक्रवारी दोन भीषण बॉम्बस्फोट झाले असतानाही अफगाणिस्तान पोलीस आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समितीला अद्यापही त्याचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बॉम्बस्फोटांपाठोपाठ गोळीबारही सुरू झाल्याचे वृत्त आहे.
गुप्तचर यंत्रणेचे रुग्णालय असलेल्या परिसरात आणि अफगाणिस्तान नागरी संरक्षण दलाचे मुख्यालय याच परिसरात असून आम्ही या घटनेचा तपास करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भारतीय दूतावासाची इमारतही स्फोटांच्या घटनास्थळाच्या जवळच असून तिला कोणताही धोका पोहोचलेला नाही. दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बंदूकधाऱ्यांनी एका इमारतीत मोक्याच्या जाग्यांवर दबा धरला असून तालिबान्यांनी हा हल्ला केला आहे. प्रथम स्फोट घडवून त्यानंतर गोळीबार सुरू केला आहे. अफगाण नागरी संरक्षण दल आणि संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संघटनांची कार्यालये तेथे आहेत.