करोना व्हायरसमुळे अमेरिकेत अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. तिथे ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तिथल्या वैद्यकीय व्यवस्थेवर मोठया प्रमाणावर ताण आहे. वैद्यकीय क्षेत्राची ही गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातील हजारो डॉक्टर, नर्सेस यांना कायमस्वरुपी कायदेशीर नागरिकत्व म्हणजे ग्रीन कार्ड द्यावे असा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडण्यात आला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सभागृहाच्या सदस्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये यासंबंधी विधेयक मांडले आहे. ‘हेल्थकेअर वर्कफोर्स सेसिलियन्स अ‍ॅक्ट’ या कायद्यातंर्गत वैद्यकीय क्षेत्रातील हजारो तज्ज्ञांना कायमस्वरुपी अमेरिकेत सेवा करण्याची संधी मिळू शकते. COVID-19 च्या या संकटकाळात हे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिकेत काम करणाऱ्या २५ हजार नर्सेस आणि १५ हजार डॉक्टरांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व मिळू शकते.

आणखी वाचा- करोना व्हायरसच्या भीतीने जिवंत प्राण्यांची बाजारपेठ बंद करण्याची गरज नाही – WHO

लोवा सारख्या काही भागांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची गरज आहे. यामुळे ती कमरता भरुन निघेल असे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. H-1B किंवा J2 व्हिसावर अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय नर्सेस आणि डॉक्टरांना याचा फायदा होऊ शकतो. H-1B व्हिसा अंतर्गत अमेरिक कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरीवर ठेवण्याची परवानगी मिळते. भारत, चीनमधून हजारो भारतीय दरवर्षी H-1B व्हिसावर काम करतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislation in us congress over green cards to foreign doctors nurses dmp
First published on: 09-05-2020 at 11:20 IST