काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदींवर विविध मुद्यांवरून टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी मोदींवर आणखी एक टीका केली आहे. काँग्रसने मागील अनेक दशकांपासून निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असल्याचा राहुल गांधी यांनी आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मागील अनेक दशकांमध्ये काँग्रेसने (अनेक देशांबरोबर) निर्माण केलेले चांगले संबंध मोदींनी संपुष्टात आणलेत. आजूबाजूला एकही मित्र (देश) नसणे (भारतासाठी) धोकादायक आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्वटि केलं आहे. शिवाय आपल्या ट्वटि सोबत त्यांनी बांगलादेशचे भारतसोबत बिघडत असलेले संबंध व त्यांची चीनशी वाढत असलेली जवळीक यासंबंधी एका बातमीचा मथळा देखील जोडला आहे.

आणखी वाचा- मोदीजींचा हेतू ‘स्वच्छ’, कृषी-विरोधी नवा प्रयत्न – राहुल गांधी

या अगोदर कृषी विधेयकांच्या मुद्यावरून निशाणा साधला होता. मोदींनी शेतकऱ्यांना समुळ नष्ट करून, श्रीमंत मित्रांचा मोठा विकास केला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती.

आणखी वाचा- देश आणखी किती #ActOfModi सहन करणार? – राहुल गांधी

पंतप्रधान मोदींनी २०१४ मधील निवडणूक कालावधीत दिलेल्या आश्वासनाची त्यांनी आठवण करून दिली होती. शिवाय, २०१५ मध्ये ते आश्वासन पूर्ण होणार नसल्याचे मोदी सरकारने न्यायालयात सांगितले व २०२० मध्ये काळा शेतकरी कायदा आणल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Living in a neighbourhood with no friends is dangerous rahul gandhi msr
First published on: 23-09-2020 at 13:39 IST