पूँछमधील सरला या गस्तीस्थळावर घुसखोरी करत पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या गोळीबारात बीएसएफ जवान रामसिंह मीणा जखमी झाले होते. त्यांचा आज (रविवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामसिंह यांनी छातीत गोळी लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज रविवार रामसिंह मीणा यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळणेही बंद झाले आणि दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक तब्बल अर्धा किमी आत शिरत पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांच्या गटाने मंगळवारी पहाटे भारतीय लष्करावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कुंडलिक माने या वीरपुत्राचाही समावेश होता. याच हल्ल्यात रामसिंह मीणा जखमी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2013 रोजी प्रकाशित
नापाक हल्ला: गोळीबारातील जखमी सैनिकाचा मृत्यू
पूँछमधील सरला या गस्तीस्थळावर घुसखोरी करत पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
First published on: 11-08-2013 at 04:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loc firing by pak death of one injured indian soldier