आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य जोडणीसाठी आम आदमी पक्षाकडून ‘मै भी आम आदमी’ हे अभियान १० जानेवारीपासून देशभर राबविण्यात येणार असल्याचे, ‘आप’चे नेता योगेंद्र यादव यांनी आज बैठकीत सांगितले.
यादव म्हणाले, ”’मै भी आम आदमी’ हे अभियान १० ते २६ जानेवारीदरम्यान देशभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांना जोडले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. तसेच, लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज १५ जानेवरीर्यंत अर्जदाराला भरता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन सदस्यांची समिती बनविण्यात येणार असून, ती समिती पक्षाचा जाहीरनामा, निधी आणि निवडणूक संबंधी सर्व कामकाज पाहणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच ‘आप’ उमेदवारांची घोषणा करणार आहे.”
हरयाणातील विधानसभा निवडणुकीत याठिकाणी असलेल्या सर्व ९० जागांवर ‘आप’ उमेदवार उभे करणार असल्याचे, यादव यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘मै भी आम आदमी’ अभियान १० तारखेपासून
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य जोडणीसाठी आम आदमी पक्षाकडून 'मै भी आम आदमी' हे अभियान १० जानेवारीपासून देशभर राबविण्यात येणार असल्याचे, 'आप'चे नेता योगेंद्र यादव यांनी आज बैठकीत सांगितले.

First published on: 05-01-2014 at 02:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha in sight aap to launch membership drive across nation from jan