अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची अल्पवयीन तरुणीशी फेसबूकवर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. यानंतर भेटण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलवून तिला डांबून ठेवलं गेलं. मग, तरूणाने आपल्या मित्रांसह मिळून अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

बिहारमधील मुजफ्फरपूर येथील नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीची रुग्णालयात तपासणी केली आहे. न्यायालयात कलम १६४ अंतर्गत तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या आईने पोलिसांना सांगितलं, एक महिन्यापासून त्यांची १३ वर्षीय मुलगी बेपत्ता होती. पोलीस आणि आम्ही सगळीकडे तिचा शोध घेतला. पण, कुठेही शोध लागत नव्हता. सत्यानंद नावाच्या व्यक्तीने तिचे अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर तिला जंगलात कैदेमध्ये ठेवण्यात आलं. जंगलातच सत्यानंदने आपल्या मित्रांसह मिळून मुलीवर वारंवार अत्याचार केले.

हेही वाचा : भगवान शिवाचा अवतार समजून मद्यधुंद व्यक्तीने महिलेबरोबर केलं भयंकर कृत्य; खळबळजनक घटना समोर

५ ऑगस्टला मुलीने संधी साधत त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. जंगलातून बाहेर आल्यानंतर एका दुचाकीवाल्याच्या मदतीने ती घरी आली. त्यानंतर मुलीने घडलेली सर्व हकीकत सांगितली. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित तरूणीच्या आईने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय कुमार सिंह यांनी म्हटलं, पीडित तरुणीची रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. तसेच, सोमवारी न्यायालयात कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.