scorecardresearch

पत्नीवरच्या प्रेमाखातर पतीने ताजमहालच आणला मध्यप्रदेशात! कसा? जाणून घ्या…

सुरुवातीला चोक्सी यांनी त्यांच्या अभियंत्यांना ८० फूट उंचीचे घर बांधण्याची विनंती केली होती. परंतु, अशा बांधकामाला परवानगी देण्यात आली नाही.

पत्नीवरच्या प्रेमाखातर पतीने ताजमहालच आणला मध्यप्रदेशात! कसा? जाणून घ्या…

मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील एका रहिवाशाने ताजमहालची प्रतिकृती तयार करून आपल्या पत्नीला भेट दिली आहे. शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चोक्सी यांनी त्यांची पत्नी मंजुषा यांच्यासाठी चार बेडरूमची इमारत बांधली. प्रेरणेसाठी हे जोडपे आग्रा येथे ताजमहालला भेट देण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याच्या आर्किटेक्चरचा बारकाईने अभ्यास केला आणि अभियंत्यांना संरचनात्मक तपशील लक्षात घेण्यास सांगितले.

सुरुवातीला चोक्सी यांनी त्यांच्या अभियंत्यांना ८० फूट उंचीचे घर बांधण्याची विनंती केली होती. परंतु, अशा बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही. या नकारानंतर त्यांनी ताजमहालसारखी रचना बांधण्याचा निर्णय घेतला.

चोक्सी यांचे अनोखे घर तीन वर्षांच्या कालावधीत बांधले गेले. अभियंत्यांनी ते ताजमहालच्या 3D प्रतिमेच्या आधारे तयार केले आहे. चोक्सी यांना विश्वास आहे की त्यांचे घर एक असा देखावा असेल जो बुरहानपूरला भेट देताना कोणत्याही पर्यटकाला चुकवता येणार नाही. सल्लागार अभियंता प्रवीण चोक्सी यांच्या म्हणण्यानुसार, हे घर मिनारांसह ९० चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. मूलभूत रचना ६० चौरस मीटर व्यापलेली आहे.

घुमट २९ फूट उंच असून दोन मजल्यावर दोन बेडरूम आहेत. घरात एक स्वयंपाकघर, एक लायब्ररी आणि ध्यान कक्ष देखील आहे. अभियंता ताजमहालला देखील भेट देऊन त्याचा तपशीलवार अभ्यास केला होता. औरंगाबादमधील अशाच प्रकारचे स्मारक असलेल्या बीबी का मकबरा येथेही ते गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 18:28 IST

संबंधित बातम्या