हैदराबादमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठजणांचा मृत्यू झाला असून, काहीजण जखमी आहेत. सोमवारी रात्री सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या शोरुममध्ये ही आग लागली. ही आग नंतर वरच्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि इमारतीमध्ये पसरली.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अधिकाऱ्यांचा प्रथामिक अंदाज आहे. शोरुम, बेसमेंट आणि पार्किगमध्ये असणाऱ्या गाड्यांनी पेट घेतला आणि नंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला. यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी धूर आणि आग पाहून अग्निशमन दलाला माहिती दिली.

विश्लेषण : विजेवर चालणाऱ्या वाहनांना आग; चौकशीत नेमके काय लक्षात आले?

अग्निशन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या सातजणांची सुटका केली. दोनजण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान सरकारने ही घटना दुर्दैवी असून, जखमींना चांगले उपचार दिले जातील अशी माहिती दिली आहे. लॉजमध्ये राहणारे इतर शहरांमधून कामानिमित्त आले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी रुमच्या खिडकीबाहेर उभे असल्याचं तसंच पाइपच्या सहाय्याने आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. गृहमंत्री आणि शहर पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.