नवी दिल्ली : पंतप्रधान वर्तमानात नव्हे तर भूतकाळात राहतात. त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी काय काम केले, याची यादी केली असती तर बरे झाले असते. पण, ते जनतेला मूर्ख बनवण्यासाठी ‘जुमलाबाजी’ करत असतात, अशी उपहासात्मक टीका राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केली.

संविधानावरील चर्चेत सहभागी होताना खरगे यांनी संघ व भाजपवर शरसंधान साधले. संघाने संविधानाला नेहमीच विरोध केला, त्यांना देशात मनुस्मृती लागू करायची होती. २६ जानेवारी २००२ मध्ये पहिल्यांदा संघाने त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला. ज्यांनी अशोकचक्र, संविधान, तिरंग्याला विरोध केला ते आम्हाला संविधानाच्या मूल्यांची शिकवण देत आहेत. या लोकांनी (संघ) संविधानाच्या प्रती जाळल्या होत्या. ज्या दिवशी संविधान देशाने स्वीकारले त्याच दिवशी दिल्लीतील रामलीला मैदानावर डॉ. आंबेडकर, नेहरू, महात्मा गांधी यांच्या प्रतिकृती जाळण्यात आल्या होत्या, असा शाब्दिक भडिमार खरगेंनी केला.

हेही वाचा >>>भारताविरोधात भूभाग वापरू देणार नाही; श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांचे पंतप्रधान मोदींना आश्वासन

मोदी आणि भाजप सातत्याने आणीबाणीचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेसकडून आणीबाणीची चूक झाली पण, ती सुधारली गेली. इंदिरा गांधींना लोकांनी शिक्षा दिली. त्या पराभूत झाल्या पण, दोन वर्षांनी त्याच जनतेने इंदिरा गांधींना पंतप्रधान केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाहीमध्ये जनता निर्णय घेत असते. मोदींनी राजपथाला ‘कर्तव्यपथ’ नाव दिले. पण, त्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे, अशी चपराक खरगेंनी दिली.