केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमुल काँग्रेसला निधीबाबत तपशील देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. सीबीआय हे पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. त्यांच्या आदेशाशिवाय हे शक्य नाही असे सांगत त्यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली. सीबीआयने इतर कोणत्याही पक्षाला नोटीस पाठवलेली नाही. तृणमूल काँग्रेसच भाजपला आव्हान देऊ शकतो हे लक्षात घेऊन आम्हाला अडचणीत आणण्यासाठी पावले उचलल्याचा आरोप ममतांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2015 रोजी प्रकाशित
ममतांची सीबीआयवर आगपाखड
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमुल काँग्रेसला निधीबाबत तपशील देण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
First published on: 13-04-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee hits out at cbi