पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जूनला बांगलादेशच्या दोनदिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना होत आहेत. या दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही सहभागी होणार असल्याची माहिती ममता यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी पार्थ चटर्जी यांनी दिली.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यात बरेच साम्य असून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उभय देशांचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा आशावाद चटर्जी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बांगलादेश सीमावाद कराराला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने बांगलादेशात मोदी सरकारबद्दल सकारात्मक मत
आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी बांगलादेश दौऱ्याला रवाना होत आहेत, हे विशेष.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2015 रोजी प्रकाशित
बांगलादेश दौऱ्यात ममतांची पंतप्रधानांना साथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जूनला बांगलादेशच्या दोनदिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना होत आहेत.
First published on: 29-05-2015 at 02:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee to join pm modi in his bangladesh visit