मुलाला पॉर्न पाहण्याची सवय होती. ती सुटत नसल्याने वडिलांनी सुऱ्याचा वार करून त्याचा हात कापल्याची घटना उघडकीस आली आहे. हैदराबाद या ठिकाणी ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. मोहम्मद कय्युम कुरेशी या व्यवसायाने खाटिक असलेल्या माणसाने हे कृत्य केले आहे. पहाडीशरीफ भागात मोहम्मद कुरेशीचे घर आहे. त्याचा मुलगा खालिद कुरेशी हा लोकल केबल टेलिव्हिजन ऑपरेटरकडे काम करतो. खालिद कुरेशीला मोबाइलवर पॉर्न पाहण्याची सवय होती असा आरोप मोहम्मद कुरेशीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद कुरेशीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
खालिदने काही दिवसांपूर्वीच स्मार्ट फोन विकत घेतला होता. मोबाइलवर खालिद रात्री उशिरापर्यंत सिनेमा आणि पॉर्न क्लिप पाहायचा असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. मोहम्मद कुरेशी आणि खालिद या दोघांमध्ये म्हणजेच वडिल मुलामध्ये या मुद्द्यावरून रोज वाद होत असत. रविवारी पॉर्न बघत असताना खालिदला त्याच्या वडिलांनी म्हणजेच मोहम्मद कुरेशीने पकडले. त्यानंतर वडिलांनी मुलाच्या हातून मोबाइल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. पण खालिदने मोबाइल सोडला नाही, तसेच वडिलांच्या हातावर एक फटका ठेवून तो घरातून निघून गेला.
सोमवारी सकाळी या दोघांमध्ये म्हणजेच मोहम्मद आणि खालिद या दोघांमध्ये पुन्हा काही कारणावरून वाद झाला. त्यावेळीच मोहम्मद कय्युमने आपला सुरा उचलला आणि मुलाच्या उजव्या हातावर वार केला. त्यानंतर खालिद किंचाळला. खालिदचा आवाज ऐकून त्याची आई आणि घरातले इतर लोक धावले. त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले. हातावर झालेला वार खोल आहे. हात वाचण्याची शक्यता ९० टक्के नाहीच असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या सगळ्या प्रकारानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात मोहम्मद कुरेशीला पोलिसांनी अटक केली आहे. खालिदच्या उजव्या हातावर मोहम्मदने वार केला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असले तरीही त्याचा हात वाचण्याची शक्यता धूसर आहे. दरम्यान याप्रकरणी मोहम्मदचा मुलगा खालिद आणि त्याची आई यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.