उत्तर प्रदेशातील बागपत येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या जन्मदात्या आईवर अत्याचाराची परिसीमा गाठली आहे. आरोपी मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला रस्त्यावरून फरपटत नेलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

संबंधित घटना बागपत जिल्ह्याच्या गुहर किशनपूर बराळ गावातील आहे. येथील वयोवृद्ध महिला आपल्या मुलाकडे विनवणी करत होती. मात्र, तिच्या मुलाने तिला पकडून रस्त्यावरून फरपटत नेलं. मुलगा आपल्या वृद्ध आईला रस्त्यावरून ओढत नेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- तुरुंगाच्या ४० फूट उंच संरक्षण भिंतीवरून मारली उडी, कैद्याच्या पलायनाचा सीसीटीव्ही VIDEO

व्हिडीओमध्ये संबंधित महिला आपल्या मुलाकडे वारंवार विनवणी करताना दिसत आहे. परंतु त्याने आपल्या जन्मदात्या आईचं काहीही ऐकलं नाही. यावेळी काही गावकऱ्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो कुणालाही जुमानला नाही.

हेही वाचा- धक्कादायक! सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शिवदत्त पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षकांनी हा व्हिडीओ काही दिवस जुना असल्याचं सांगितलं. या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.