एका वृद्धाने विनापरवानगी हँडपम्प वापरल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सालेमपूर गावात घडली. या वृद्धाला हँडपम्प मालकांनी मारहाण केली. मृताने तहान लागल्याने विनापरवानगी हँडपम्पावरून पाणी प्यायले होते. या शुल्लक कारणावरून आरोपींनी वृद्धाला जबर मारहाण केली.

पीडित वृद्धाचा मुलगा रमेश सैनी यांनी एएनआयला सांगितले की, “माझे वडील गुरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. त्यांना तहान लागली आणि ते पाण्यासाठी हातपंपावर गेले. परवानगीशिवाय पाणी प्यायल्याचा हँडपम्प वापरल्याचा मालकांना राग आला. आरोपी बापलेकांनी माझ्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला. आमचे हँडपम्प मालकाशी कोणतेही वैर नव्हते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मृताला त्याच्याच जातीतील काही लोकांनी मारहाण केली होती. यामध्येच ६ नोव्हेंबरच्या पहाटे वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” असे उपविभागीय पोलीस अधिकारी राघव दयाळ यांनी सांगितले.