कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एका ऑटोमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धावत्या ऑटोमध्ये झालेला स्फोट अपघात नसून दहशतवादी कृत्य असल्याचं कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सांगितले आहे. शनिवारी एका धावत्या ऑटोत स्फोट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेत चालकासह प्रवाशी गंभीररित्या भाजले आहेत.
“हा स्फोट अपघाती नसून गंभीर नुकसान करण्याच्या उद्देशाने केलेलं दहशतवादी कृत्य होतं, हे आता निश्चित झालं आहे. केंद्रीय यंत्रणांसह कर्नाटक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे”, अशी माहिती ट्वीटद्वारे प्रवीण सूद यांनी दिली आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा मंगळुरूमध्ये दाखल झाल्याचं कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे. “दहशतवादी संघटनांशी संबंधित काही लोकांचा या कृत्यामागे हात असल्याचा आम्हाला संशय आहे. येत्या दोन दिवसांत या कृत्यामागील लोक आणि कारणांचा शोध लागेल”, असे ज्ञानेंद्र यांनी म्हटले आहे.
“माझ्या लैंगिकतेमुळेच…” ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल यांचा मोदी सरकारवर मोठा आरोप
“विशेष पथक आणि फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत. स्फोटाच्या कारणांचा शोध या पथकांकडून घेतला जात आहे”, अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी दिली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण असून शहरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
“आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?” ; संजय राऊतांचा संतप्त सवाल!
“या घटनेविषयी नागरिकांनी अफवा पसरवू नये. त्यांनी शांत राहावं आणि घाबरू नये”, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे. घटनेच्या व्हिडीओमध्ये सुसाट ऑटो रस्त्यावर थांबत असताना हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या शेजारी या ऑटोनं अचानक पेट घेतला होता.
