पीटीआय, इम्फाळ

आपले सरकार इम्फाळ खोऱ्यातील एका बंडखोर गटाशी चर्चा करत असून, लवकरच एका शांतता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी सांगितले. ही बोलणी प्रगत टप्प्यावर असल्याची माहिती सिंह यांनी पीटीआय-व्हिडीओशी बोलताना दिली, मात्र या भूमिगत संघटनेचे नाव त्यांनी सांगितले नाही. ‘आम्ही चर्चेत प्रगती करत आहोत आणि लवकरच एका भूमिगत संघटनेशी शांतता करार करण्याची आम्हाला अपेक्षा आहे’, असे ते म्हणाले.

India Aghadi plan to rewrite the Constitution Allegation of Prime Minister Narendra Modi
‘इंडिया आघाडी’कडून राज्यघटनेच्या पुनर्लेखनाची योजना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
Chief Minister Eknath Shinde refused to answer a question on the implementation of the package
पॅकेजच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव; मराठवाडातील टंचाई आढावा बैठक वेळकाढूपणा असल्याची विरोधकांकडून टीका
narendra modi nashik rally
“राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!
Political controversy over Prajwal Revanna inquiry
प्रज्वल रेवण्णाच्या चौकशीवरून राजकीय वाद; भाजप सीबीआयसाठी आग्रही तर मुख्यमंत्री ‘एसआयटी’ तपासावर ठाम
BJP National Organization Minister BL Santosh message to office bearers in Thane regarding the election
नाराज होऊ नका, मोदींसाठी निवडणुकीचे काम करा; भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांचा ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना संदेश
Sudhir Mungantiwars demand SIT inquiry into malpractices in liquor license distribution
दारु परवाना वितरणात गैरव्यवहार, एसआयटी चौकशीची मुनगंटीवारांची मागणी
undertrial criminal gangs in yavatmal district Jail attack prison officer and
यवतमाळ जिल्हा कारागृहातील न्यायाधीन कैद्यांचा तुरुंग अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ला
Supreme court Order on arvind Kejriwal interim bail tomorrow
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर उद्या आदेश

 राज्यात गेल्या ३ मे रोजी वांशिक हिंसाचार उफाळल्यानंतर, सरकार अशा प्रकारची बोलणी करत असल्याबद्दल पहिल्यांदाच अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ) या प्रतिबंधित संघटनेच्या एका गटाशी सरकार बोलणी करत असल्याचे सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते.अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आल्यानंतर मे महिन्यापासून उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १८० हून अधिक लोक ठार झाले आहेत.