scorecardresearch

Premium

मणिपूरमधील सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, शांतता करारावर स्वाक्षरी, हिंसाचार थांबणार?

Manipur Armed Group UNLF Signed Peace Agreement : मणिपूरमधील युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट ही सशस्त्र संघटना गेल्या ६० वर्षांपासून सत्ताधाऱ्यांविरोधात हिंसेच्या मार्गाने लढत होती.

Manipur UNLF Signs Peace Agreement
मणिपूरमधील सर्वात जुना सशस्त्र गट यूएनएलएफची शांतता करारावर स्वाक्षरी (PC : Amit Shah/X)

UNLF Signs Peace Agreement : मणिपूरमधील बंडखोरांचा सर्वात जुना सशस्त्र गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (यूएनएलएफ) हिंसेचा मार्ग सोडत मुख्यधारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने आपली शस्त्रं टाकत शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेचं वर्णन करताना गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की, आपण हा एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. यूएनएलएफने आज नवी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ईशान्येत कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करता येणार आहे. मोदी सरकारच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे.

अमित शाह यांनी म्हटलं आहे की, मणिपूर खोऱ्यातील सर्वात जुना सशस्त्र गट यूएनएलएफने हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लोकशाही प्रक्रियेत परतल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.

Democrats Germany
जर्मनीत लोकशाहीवादी विरुद्ध फासिस्ट शक्ती!
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
myanmar womans chaturang article, myanmar spring revolution,
स्त्री ‘वि’श्व : लढा.. लोकशाहीसाठी!
jharkhand cm designat champai soren
झारखंडमधल्या सत्तानाट्यावर पडदा; गुरुवारी मोठ्या घडामोडी; आज होणार चंपई सोरेन यांचा शपथविधी!

अमित शाह यांनी आणखी एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारत सरकार आणि मणिपूर राज्य सरकारने यूएनएलएफबरोबर शांतता करार पूर्ण केला आहे. हा शांतता कर गेल्या सहा दशकांपासून चालत आलेल्या सशस्त्र आंदोलनाच्या अंताचं आणि नव्या आरंभाचं प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वसमावेशक धोरण, सर्वांना बरोबर घेऊन विकास करण्याचा दृष्टीकोन आणि ईशान्य भारतातील तरुणांना उत्तम भविष्य प्रदान करण्याच्या दिशेने उघडलेल्या मोहिमेतलं हे मोठं यश आहे.

हे ही वाचा >> “CAA लागू करणारच, आम्हाला कोणीच…”, अमित शाहांचं मोठं वक्तव्य; ममता बॅनर्जींना आव्हान देत म्हणाले…

केंद्रीय गृह मंत्रालयाने अलिकडेच यूएनएलएफसह अनेक अतिरेकी आणि नक्षली संघटनांवर बंदी घातली होती. या बंदीनंतर काहीच दिवसांत यूएनएलएफने शस्त्रं टाकून शांतता करार मान्य केला आहे. या संघटनेवर मणिपूरमधील सुरक्षा दल, पोलीस आणि नागरिकांवर हल्ले करण्याचे आणि अनेक हत्या करण्याचे आरोप आहेत. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांमध्ये सहभाग असल्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली होती. यूएनएलएफ हा मणिपूरमधील सर्वात जुना मैतेई बंडखोर गट आहे. २४ नोव्हेंबर १९६४ रोजी या गटाची स्थापना झाली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manipur militant group unlf signed peace agreement amit shah announces asc

First published on: 29-11-2023 at 20:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×