बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) आमदाराच्या मालकीचा पेट्रोल पंप माओवाद्यांनी जाळला तसेच या आमदाराच्या निवासस्थानावर देखील हल्ला चढविला.
बिहारमधील भाजपचे आमदार राम सुरत राय यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर अचानक माओवाद्यांनी जाळपोळ करण्यास सुरूवात केली. तसेच तेथील कर्मचाऱयांना जबर मारहाण केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
या आमदाराच्या घरावर देखील माओवाद्यांनी बॉम्ब फेकले सुदैवाने राय त्यावेळी घरी नव्हते. घरात असलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुले सुखरुप बचावले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहताच माओवाद्यांनी तेथून पळ काढला. घटनेचा सविस्तर आढावा घेऊन पोलीसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maoists torch bjp mlas petrol pump attack his home in bihar
First published on: 14-03-2014 at 07:59 IST