भारताच्या मार्स ऑरबायटर अवकाशयानाचे काल पीएसएलव्ही सी २५ या प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर आता ते पृथ्वीभोवती सुरळितपणे फिरत आहे. त्याची कक्षा उद्या वाढवण्यात येणार असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी सांगितले.
इस्रोच्या प्रवक्तयाने सांगितले की, मार्स ऑरबायटर अवकाशयान हे पृथ्वीच्या कक्षेत मंगळवारी पाठवण्यात आले ते आता व्यवस्थित काम करीत असून गुरुवारी सकाळी लवकर त्याची कक्षा रुंदावण्याचे प्रयत्न सुरू केले जातील.
मार्स ऑरबायटर यानाने पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली असून पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्याच्या अगोदर त्याने पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करणे अपेक्षित आहे. मार्स ऑरबायटर यान सोडल्यानंतर त्याचे नियंत्रण इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क या बंगलोर येथील यंत्रणेकडे आहे. मार्स ऑरबायटर यानाने नायजेरिया ओलांडले असून आफ्रिका खंडातील चॅड या देशावरून ते जात होते. मार्स ऑरबायटर यान उपभू स्थितीत पृथ्वीपासून २६४.१ कि.मी, दूर तर अपभू स्थितीत २३९०३.६ कि.मी. दूर आहे. संकेतस्थळानुसार मंगळयान भारतावरून जाणार नाही कारण त्याचा मार्ग हा हिंदी महासागराला छेदणारा आहे. दुपारी ते सोमालियावरून जाताना दिसेल. भारताच्या मार्स ऑरबायटर यानाचा आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक २०१३-०६० ए असा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2013 रोजी प्रकाशित
मंगळयानाची कक्षा गुरुवारी वाढवणार
भारताच्या मार्स ऑरबायटर अवकाशयानाचे काल पीएसएलव्ही सी २५ या प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर आता
First published on: 07-11-2013 at 04:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars mission on right track ready for orbit raising on thursday